Homeआरोग्यविषयककेयरिंग फॉर किडनी

केयरिंग फॉर किडनी

किडनी म्हणजेच मूत्रपिंड आणि त्यात कधी कधी निर्माण होणारी अडचण म्हणजे मुतखडा, जो भरपूर पाणी पिण्याने निघून जातो आणि नारळ पाणी तर त्याच्यासाठी बेस्ट आहे, असे जेव्हा वारंवार कानावर पडू लागले तेव्हा क्रोनिक किडनी डिसीज आणि लॉन्ग टर्म किडनी डिझीज यात आणि साधे ब्लॅडर स्टोन हे प्रकरण समजून घेण्यात गडबड होते आहे, असे जेव्हा लक्षात आले तेव्हा आपण क्रोनिक किडनी डिझीज समजून घेताना तो इतर पेशंट आणि त्यांचे नातेवाईक यांना समजावून सांगण्याची गरज आहे, असे प्रकर्षाने वाटले आणि त्यातून तीन वर्षांपूर्वी केयरिंग फॉर किडनी या सहायता गटाचा जन्म झाला.

किडनीच्या रोगाबद्दल आणि त्यावर असलेल्या उपचारांबद्दल लोकांमध्ये अजूनही हवी तशी आणि तेवढी माहिती नाही. जगात प्रत्येक दहा रुग्णामागे एक रुग्ण हा किडनीच्या आजाराने ग्रस्त आहे, असे आकडेवारी सांगते. पण किडनी फेल होणे म्हणजे नेमके काय असते आणि त्याचे शरीरावर काय परिणाम होतात, हे बहुतांश रुग्णांना किडनी फेल झाल्यावर कळते. म्हणून हा आजार म्हणजे नेमके रुग्णाला काय होते, हे समजावून सांगण्यासाठी हा सहायता गट आहे.

खूप मोठ्या प्रमाणात तणावग्रस्त आयुष्य असलेले आणि ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, ज्यांना खूप हाय शुगर म्हणजेच मधुमेह आहे आणि अनेक वर्षांपासून आहे, किंवा ज्यांना लघवीतून प्रोटीन जाते त्यांना किडनी फेल्युअर संभवते. इतरही अनेक करणे यात आहेत. पण वर दिलेली करणे ही प्रमुख आहेत. कमालीचा लठ्ठपणा हे देखील किडनी निकामी होण्याचे एक कारण ठरू शकते.

डोळ्यांवर सूज येणे यापासून लक्षणे दिसायला सुरुवात होते आणि मग हळूहळू संपूर्ण चेहऱ्यावर, हातांवर, पायांवर सूज दिसू लागते आणि पोट वाजवीपेक्षा जास्त मोठे दिसायला लागते. तेव्हा डॉक्टर किडनीच्या चाचण्या करून निदान करतात. शरीरात पाणी थांबण्याची प्रक्रिया सुरु होऊन शरीरातील अशुद्धीचे प्रमाण वाढत जाते आणि रुग्णाला शरीराराला खाज सुटायला सुरुवात होते. लघवी होण्याचे प्रमाण कमी कमी होत जात ते एक दिवस बंद ही होऊ शकते. अशावेळेस मूत्रपिंड विकार तज्ञ म्हणजे नेफ्रोलॉजिस्ट हे रुग्णांना डायलिसिस घ्यायला सांगतात.

पण अर्थातच जसे या रोगाबद्दलच एकंदर खूप कमी माहिती लोकांना आहे, त्यामुळे त्याच्या उपचाराबद्दलही लोक फार अनभिज्ञ आहेत. उपचार जसे की डायलिसिस आणि पुढे जाऊन किडनी प्रत्यारोपण म्हणजे ट्रान्सप्लांट हे म्हणजे नेमके काय, हे सुद्धा समजावून सांगण्याची गरज पडते.

केयरिंग फॉर किडनी हा एक असा सहायता गट आहे जिथे तुम्हाला किडनीच्या आजाराबद्दल इत्यंभूत माहिती मिळेल आणि त्यासाठी उपचार घेत असला तर ढोबळमानाने काय काय करायचे असते जेणे करून उपचार हे आधीच चांगल्या पद्धतीने घेता येतील, याचेही थोडे मार्गदर्शन करण्यात येते. उपचारांसाठी येणार आर्थिक भार सांभाळताना कुठून, कशी मदत मिळू शकते, कुणाला मिळू शकते, कोण आणखी पैशाची व्यवस्था करू शकतो आणि भविष्यात उपचार घेत असतानां काय काय संभावित काळजी घ्यावी लागते म्हणजे आरोग्य आटोक्यात ठेवता येणे शक्य होते, हे देखील या सहायता गटाच्या माध्यमातून समजावून सांगण्याचे काम केले जाते.

हा सहायता गट सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित जनकल्याण समितीच्या महाराष्ट्र प्रांत कार्यालयात एरंडवणे येथील सेवा भवन या इमारतीत स्थित आहे. इथे एक डायलिसिस विभागही आहे, जिथे सहायता गटाच्या माध्यमातून येणाऱ्या रुग्णांचे समुपदेशन केले जाते आणि त्यांना उपचार अधिक प्रभावी होण्यासाठी मदत पुरविली जाते.

सहायता गटातर्फे मंडल, कलमकारी, वारली या चित्रकृतींची विक्री करून जो निधी गोळा केल्या जातो तो अत्यंत गरजू डायलिसिस रुग्णांना मदत म्हणून वापरला जातो. मात्र ठराविक अशी आर्थिक मदत रुग्णांना केली जात नाही.
सल्ला, मार्गदर्शन केंद्रातर्फे गरजू रुग्णांना इथे सल्ल्याचे पैसे आकारले जात नाही.

सहायता गटाला भविष्यात स्वयंसेवक समुपदेशकांची मदतीची गरज लागणार आहे. जे रुग्ण डायलिसिसची चार तासाच्या सेशन करीत सोबत कुणाला आणू शकत नाही, त्यांना सोबत करायला, त्यांच्याशी गप्पा करायला आणि थोडे त्यांचे समुपदेशन करायला अशा स्वयंसेवकांची गरज आहे. तेव्हा इच्छुक लोकांनी संपर्क करावा.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments