Homeआरोग्यविषयकअल्झायमर्स सपोर्ट पुणे

अल्झायमर्स सपोर्ट पुणे

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, मेमरी क्लिनिक आणि अल्झायमर्स सपोर्ट ग्रुप, पुणे येथील उपक्रम

डिमेंशिया रुग्ण आणि कुटुंबियांसाठी कार्यक्रम

· आजाराची माहिती आणि काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन – OPD मध्ये तसेच काळजीवाहक प्रशिक्षण कार्यक्रमांमधुन डिमेंशिया आजाराबद्दल माहिती तसेच काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. काळजीवाहकाने स्वतःची काळजी घेण्याचे महत्त्वही सांगीतले जाते.

· मेमरी लॅब – लॅब मध्ये डिमेंशिया झालेल्या व्यक्तींच्या मेंदूची क्षमता टिकवून ठेवण्यासाठी मेंदूला उपयुक्त अशा गोष्टींमधून विशेष प्रयत्न केला जातो. लॅबमध्ये भाग घेतल्याचे विविध फायदे दिसतात उदा. आत्मविश्वासात तसेच एकाग्रचित्ततेत वाढ होते, लोकांमध्ये मिसळण्याची संधी मिळते. लॅबमधील सहभाग हा एक आनंददायी अनुभव असतो.

· अल्झायमर्स सपोर्ट ग्रुप – परस्परांशी संवाद, प्रश्न कसे सोडवावेत ह्याची चर्चा, तज्ञांचे मार्गदर्शन इत्यादी कार्यक्रमांमधुन रुग्ण आणि कुटुंबीय यांचा प्रवास सामान्यपणे व्हावा, काळजीवाहकांचा ताण कमी व्हावा यासाठी सपोर्ट ग्रुप महत्त्वाचा ठरतो. सपोर्ट ग्रुप मिटींग दर पहिल्या रविवारी दुपारी कोथरुड मध्ये भरते. सध्या झूमवरुनही काही सत्रांचे आयोजन केले जाते.

· होम व्हिजिटमधुन विशेष मदत – ज्या रुग्णांना तसेच कुटुंबियांना विशेष मदतीची आवश्यकता असते त्यांच्यासाठी प्रशिक्षित समाजसेवकांमार्फत होम-व्हिजिट केल्या जातात. होम व्हिजिट किती काळ चालू रहातील हे प्रत्येकाच्या गरजांवर अवलंबून असते. प्रगत स्थितीतील रुग्णांसाठी पॅलिएटिव्ह केअरचे मार्गदर्शन केले जाते.

· डिमेंशिया विषयक प्रशिक्षण – काळजीवाहकांसाठी डिमेंशिया, रुग्णांची काळजी तसेच वर्तन समस्या या विषयात प्रशिक्षण दिले जाते.

· ह्याशिवाय वर्षभर मनोरंजनात्मक कार्यक्रम, विविध विषयांवर तज्ञांची व्याख्याने इत्यादी कार्यक्रम आयोजित केले जातात.

सर्वांसाठी कार्यक्रम

· जनजागृती – विस्मरणाच्या प्रश्नाबाबत तसेच मेंदूचे आरोग्य राखण्यासाठी विविध मार्गांनी जागृती कार्यक्रम वर्षभर चालू असतात. त्यासाठी प्रसंग-नाट्य, प्रदर्शन, अभिवाचन, भाषण इत्यादी कार्यक्रमांद्वारे विशेष प्रयत्न केला जातो. गंभीर विस्मरणाचे निदान वेळीच व्हावे म्हणून मेमरी कॅम्पचे आयोजनही केले जाते. ज्येष्ठ आणि (सर्वसाधारण) विस्मरण, केअ‍र गिव्हींग, मेंदूचे आरोग्य कसे टिकवावे अशा संबंधित विषयावर व्याख्याने दिली जातात. सप्टेंबर महिना डिमेंशिया जागृती महिना म्हणून साजरा होतो. ह्या महिन्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

· मेमरी क्लब – “मेंदू वापरा नाहीतर गमवा” ह्या उक्तीनुसार नाविन्यपूर्ण आव्हानांमधुन मेंदूला तरतरीत ठेवण्याचा हा एक तजेलदार उपक्रम आहे.

· स्मरणवर्धिनी कार्यशाळा – मेंदूच्या आरोग्याकडे लक्ष देऊन मेंदू आयुष्यभर कसा सक्षम ठेवावा ह्याचे मार्गदर्शन ह्या दोन दिवसांच्या कार्यशाळेत दिले जाते.

अल्झायमर्स सपोर्ट ग्रूप पुणे यांची वेबसाईट

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments