Homeज्येष्ठांसाठीआजोळ परिवार

आजोळ परिवार

श्री जगदंबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था , राक्षसभुवन तांबा हि संस्था मानव , निसर्ग व विशेष घटकांसाठी ग्रामीण भागासाठी कार्यरत आहे.
संस्थे अंतर्गत ग्रामीण भागात वृक्षारोपण करणे , श्रमदानातून पाणी अडविण्यासाठी CCT, डिप CCT तयार करणे , गावच्या विकासासाठी सार्वजनिक कामे करण्यासाठी प्रोत्साहन देणे.युवक कल्याणकारी योजना राबवणे , त्याचबरोबर प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

श्री जगदंबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित, आजोळ परिवार हा प्रकल्प गेल्या पाच वर्षांपासून निराधार- वृध्द , दिव्यांग , अनाथ , मतिमंद व रस्त्यावर भटकणाऱ्यांसाठी पुर्णपणे मोफत सुरू आहे. प्रकल्पावर अशा निराधार व अत्यंत मलिन अवस्थेत असणाऱ्या व्यक्तींना आणत, त्यांची केस कमी करणे, नखे कापणे, नवीन कपडे देत इथून पुढे त्यांच्या निवासासह त्यांच्या भोजनाची , आरोग्याची काळजी घेतली जाते.

आजोळ परिवार प्रकल्प हा कर्ण तांबे हे कंपनीत करित असलेल्या कामाचा पगार(१८,४००) व समाजातील स्थानिक दानशूर व्यक्तींच्या मदतीवर असंख्य अडचणींना सामोरे जात चालत आहे. आजोळ परिवार प्रकल्पाचा उद्देश हा समाजातील उपेक्षीत व सामाजिक साखळीबाहेर असणाऱ्या व्यक्तिंना पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी कायम प्रयत्न करणे हा आहे.त्यासाठी समाजात अडचणीत असलेल्या वृद्ध व्यक्तींसाठी प्रकल्प नेहमी मदतीसाठी तत्पर आहे.

कुटूंबातील निर्माण झालेले गैरसमज , वृध्दांना समजून न घेणे , निर्णयप्रक्रियेत सामावून न घेतल्याने ते एकाकी पडतात.मनातल्या मनात खचतात.अशा अवस्थेतून जाणाऱ्या वृध्द व्यक्तींचा शोध घेणे, त्यांच्या कुटूबियांचे समुपदेशन करणे व हि घटना पुन्हा घडू नये, म्हणून त्यावर लक्ष देणे, हे काम आजोळ परिवार ग्रामीण भागात अहोरात्र करत आहे. धकाधकीच्या जीवनात मानवी मनावर अनेक छोटे मोठे आघात होतात.कधी कधी आघात इतके भयंकर असतात , की यातून एखादी व्यक्ती बाहेर पडतच नाही.परिणामी याचे वेडात रूपांतर होते. आणि असे मनोरूग्ण मग रस्त्यावर भटकत असतात. मिळेल ते व मिळेल तसं खातात.यांचा आरोग्याचा प्रश्न खूप गंभीर आहे.

अशा व्यक्तींना आजोळ परिवार प्रकल्पावर आणने शक्य नाही, म्हणून यासाठी मागिल बारा वर्षांपासून (सन-२०११ पासून) रस्त्यावर भटकणाऱ्या मनोरूग्ण व्यक्तींना वास्तव्य आहे त्याच ठिकाणी अंघोळ घालणे, त्यांची कटींग दाढी करणे ,नखे कापणे, त्यांच्या जखमा स्वच्छ करणे, त्यांना जुनेच परंतु स्वच्छ कपडे देणे, नवीन चप्पल, अंथरूण पांघरूण देणे इत्यादी केले जाते.

आपल्याला प्रवाहाच्या बाहेर असणाऱ्या व्यक्तींना कुटूंबातीत, मुख्य प्रवाहात आणावयाचे आहे. समाजातील भरकटत चाललेल्या घटकास त्यांचे कर्तव्य समजावून सांगत कुटूंबव्यवस्था मजबूत करायची आहे.जेणेकरून भविष्यातील परिस्थिती नियंत्रणात राहू शकेल.

प्रकल्पात निव्वळ निराधार , अपंग , अंध व मतिमंद वृध्द व्यक्ती राहण्यास असून, त्यांच्या त्यांचेसह अनिवासी मनोरूग्णांचीही सेवा-सुश्रुषा आम्ही पती-पत्नी अहोरात्र करित आहोत.

या कार्यासाठी आपल्या सर्वांचे आशिर्वाद व मदतीची आम्हाला अतिशय गरज आहे.

आपलेच,
सौ कोमल व श्री कर्ण तांबे.
सदैव आपलेच,
आजोळ_परिवार
www.aajolparivar.org

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments